मुंबई : Stock Market Updates:जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे तसेच कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींमुळे आज भारतीय शेअर बाजार सुरू होताच दमदार तेजी नोंदवली गेली. सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने हिरव्या चिन्हांसह व्यवहार करण्यास सुरुवात केली. व्यापार सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स 395.71 अंकांच्या वाढीसह 54,146.68 वर उघडला. आणि निफ्टी 16,113.75 अंकांवर उघडला. प्री-ओपन सत्रादरम्यान, सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी नोंदवली गेली.


जागतिक शेअर बाजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे जागतिक शेअर बाजारातील खरेदीमुळे अमेरिकी बाजारात किंचित तेजी दिसून आली. आयटी शेअर्स सध्या बाजाराला बळकटी देत आहेत. युरोपीय बाजारात 1.5 टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवण्यात आली आहे. आशियाई बाजारातही मजबूती दिसून आली.


बुधवारी शेअर बाजार तेजीचा ट्रिगर


बुधवारी बऱ्याच कालावधीनंतर शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सत्राअखेर बीएसईचा सेन्सेक्स 616.62 अंकांनी उसळी घेत 53,750 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 178.95 अंकांच्या वाढीसह 15,989.80 अंकांवर बंद झाला.