Share Market : 22 ऑक्टोबर रोजी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 80,800 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी निफ्टीदेखील 100 हून अधिक अंकांनी घसरला आहे. सध्या 24,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकांनीही 0.10 टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज शेअर मार्केटमध्ये डाऊ जोन्स इंडस्ट्रियलमध्ये 344 अंकांची घसरण दिसून आली आहे. बाजारासाठी जागतिक संकेत आज 42931.60 च्या पातळीवर बंद झाले. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकन बाजारातही मोठी घसरण दिसून आली होती. NASDAQ कंपोझिटमध्ये 50 अंकांची वाढ झाली असून तो 18540 च्या पातळीवर बंद झाला आहे तर S&P 500 निर्देशांक सुमारे 11 अंकांनी कमकुवत होऊन 5853.98 च्या पातळीवर बंद झाला आहे. 


आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY फ्लॅट आहे तर Nikkei 225 1.45 टक्क्यांनी घसरत आहे. स्ट्रीट्स टाइम्समध्ये 0.11 टक्के कमजोरी आहे तर हँग सेंग हा पूर्णपणे घसरला आहे. तैवान वेटेड 0.58 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे, तर कोस्पीमध्ये 1.01 टक्क्यांनी घट झाली आहे. शांघाय कंपोझिट 0.06 टक्के वाढ दर्शवत आहे.


सर्वाधिक तेजीत असणारे शेअर्स- POWERGRID, ICICIBANK, INFY, TECHM, TITAN


आज सर्वात जास्त घसरलेले शेअर्स- BAJAJ-AUTO, TATACONSUM, SBILIFE, KOTAKBANK, TATASTEEL


आयपीओचा दुसरा दिवस


आज 22 ऑक्टोबर आयपीओचा दुसरा दिवस आहे. हे IPO दीपक बिल्डर्स अँड इजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि वारी एनर्जी लिमिटेड कंपनीचे असतील. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 23 ऑक्टोंबरपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE)वर 28 ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध केले जातील.


शेअर मार्केट घसरण्याची कारणे


जास्त फायदा


बाजारभावात घट झाल्याने, गुंतवणूकदार आणि कर्जाखालील व्यवसायांना शेअर बाजारातून बाहेर पडण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारात घसरण होते. 


महागाई दर


सर्वसाधारणपणे जास्त व्याजदरामुळे कर्ज घेण्याची किंमत वाढते. त्यामुळे शेअर बाजारातील खरेदी मंदावते आणि परिमाणी शेअर बाजारावर त्याचा परिणाम होऊन मार्केटमध्ये घसरण होते. 


राजकीय वातावरण


शेअर बाजाराला स्थिरता आवडते. राजकीय घडामोडींमुळे किंवा सत्तापालट आणि संघर्षांसारख्या घटनामुळे आर्थिक बाजारावर त्याचा परिणाम होते. त्यामुळे शेअर मार्केट देखील घसरते. 


कर बदल


जेव्हा सरकार करामध्ये बदल करते. तेव्हा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होते. यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला आणखी धक्का बसू शकतो आणि बाजारातील आणखी बिघडू शकतो.