Stock Market | शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका
जागतिक बाजारातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारांवरही पाहायला मिळाला.
मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसत आहे. बाजारात सुरूवातीला घसरण नोंदवण्यात आली होती. नंतर काहीशी नफा वसुली झाली. परंतू पुन्हा शेअरमार्केटमध्ये विक्रीचा सपाटा सुरू झाला. मार्केट बंद झाले तेव्हा सेसेंक्समध्ये 1150 अंकांहून अधिक घसरण नोंदवली गेली तसेच सेंसेक्स 59985च्या स्तरावर बंद झाले. निफ्टीदेखील 17852 अंकावर बंद झाले.
निफ्टी इंडेक्सदेखील 2.5 टक्क्यांनी घसरले. ऑटो, आयटी, मेटल, एफएमसीजी, रिअल्टी आणि फार्मा शेअरमध्ये तुफान विक्री पाहयला मिळाली. ITC, ICICIBANK, TITAN, KOTAKBANK, AXISBANK, SBI आणि HDFCBANK चे शेअर्स आज सर्वात जास्त कोसळले.
ग्लोबल संकेतांचा परिणाम
जागतिक बाजारातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारांवरही पाहायला मिळाला. बुधवारी अमेरिकी बाजारातही Dow Jones मध्ये 266 अंकाची पडझड दिसून आली. नॅस्डेक फ्लॅट बंद झाला तर S&P500 इंडेक्समध्ये देखील घसरण दिसून आली.