Share Market : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टी देखील 200 हून अधिक अंकांनी घसरला. आज सकाळी शेअर बाजार आघाडी घेत हिरव्या चिन्हावर उघडला. मात्र दिवसभराच्या व्यवहारानंतर शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स 651 अंकाच्या घसरणीसह 59,650 वर बंद झाला तर निफ्टी 200 अंकाच्या घसरणीसह 17,760 वर बंद झाला. आज शेअर बाजारात फक्त 6 शेअर्समध्ये वाढ झाली तर तब्बल 44 शेअर्स खाली आले. TCS,BAJAJ-AUTO,ADANIPORTS सारखे शेअर्स तेजीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचे टॉप शेअर्स 


अदानी पोर्ट्स ४.६५ टक्के, लार्सन २.१९ टक्के, इन्फोसिस ०.८९ टक्के, आयशर मोटर्स ०.३७ टक्के, बजाज ऑटो ०.३४ टक्के, टीसीएस ०.१३ टक्के


आजचे टॉप लूजर्स


 इंडसइंड बँक ४.०५ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.०८ टक्के, बजाज फायनान्स २.५३ टक्के, टाटा स्टील २.२७ टक्के, मारुती सुझुकी २.१० टक्के, रिलायन्स १.९१ टक्के, एनटीपीसी १.८४ टक्के, एचयूएल १.७९ टक्के.


आज LIC च्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. एलआयसीचा शेअर आजही 11.75 च्या वाढीसह 684.50 वर बंद झाला.