Share Market: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजही (17 ऑगस्ट ) शेअर बाजारात (Share Market Opening Session) तेजी आहे.  बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले असून सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे . जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाले होते. पण या आठवड्याच्या सुरवातीपासूनच शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आज शेअर बाजाराच्या सुरवातीला 138 अंकांनी तेजीसह सुरू होऊन 59,980 वर गेला तर निफ्टी 49 अंकाच्या तेजीसह 17,873 वर सुरू झाला. तर जुलैमध्ये घाऊक महागाई दरात घट झाल्याने बाजारातील भावनांना चालना मिळाली. मंगळवारी बाजारात मेटल आणि पीएसयू बँका वगळता सर्वच क्षेत्रात खरेदी दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स 379.43 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 59,842.21 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 127.10 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 17,825.30 वर बंद झाला.



आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?


एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)


अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)


आयशर मोटर्स (EICHERMOT)


बीपीसीएल (BPCL)


मारुती (MARUTI)


हिंदूस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)


एमआरएफ (MRF)


भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)


टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)


लॉरस लॅब (LAURUSLABS)