मुंबई : पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा असू शकतात आणि या घोषणांमुळे अनेक क्षेत्रे आणि शेअर्समध्ये तेजीची शक्यता असते. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देणासाठी मार्केट एक्सपर्ट चांगले फंडामेंटल असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झी बिझनेस रिसर्च अॅनालिस्ट आशिष चतुर्वेदी यांनी एक दमदार स्टॉक निवडला आहे. झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांनीही या स्टॉकमध्ये गुंतवणूकीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बजेटपूर्वी चतुर्वेदी यांनी पीएनबी हाउसिंगवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जाणून घेऊया की कोणत्या कारणांमुळे हा स्टॉक अनिल सिंघवी यांच्या पसंतीच्या शेअरच्या यादीत समाविष्ट झाला आहे.


पीएनबी हाउसिंगमध्ये खरेदी सल्ला
आशिष चतुर्वेदी यांनी म्हटले की, बजेटपूर्वी पीएनबी हाउसिंगच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवायला हवे. कारण केंद्र सरकारचे रिअल इस्टेट क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. त्यासाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीएनबी हाउसिंगला या क्षेत्रात 30 वर्षाहून अधिक अनुभव आहे.


आशिष चतुर्वेदी यांनी सांगितले की, कंपनी देशातील 94 शाखांसह 64 शहरांमध्ये अस्तित्वात आहे. अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राबाबत कोणतीही घोषणा झाली, तर प्रथम त्याचा परिणाम हाऊसिंग फायनान्‍स क्षेत्रावर होतो.


PNB Housing - BUY
CMP - 519
लक्ष्य - 700/900


कंपनीचे फंडामेंटल्स


या शेअरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा सातत्याने वाढत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने वितरित केलेल्या एकूण कर्जामध्ये किरकोळ विक्रीचा वाटा 96 टक्के होता. हा स्टॉक 10 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. वॅल्युएशनच्या दृष्टीने हा अतिशय स्वस्त स्टॉक आहे.


अनिल सिंघवी यांचीही पसंती
अनिल सिंघवी म्हणतात की अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेचा विकास वाढवण्यासाठी गृहनिर्माण वित्त क्षेत्र आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर विशेष भर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातील घोषणेनंतर या क्षेत्रांना चालना मिळू शकते.