गुंतवणूकीसाठी पैसा तयार ठेवा! लवकरच हे दोन IPO बाजारात येणार
SEBI ने दोन कंपन्यांच्या IPOला परवानगी दिली आहे.
मुंबई : सेक्युरटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)ऍग्रोकेमिकल टेक्निकल्स कंपनी इंडिया पेस्टीसाइड्स आणि कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे IPO जारी करण्याला परवानगी दिली आहे. PTIच्या वृत्तानुसार दोन्ही कंपन्यांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीला सेबीमध्ये कागदपत्र जमा केले होते.
कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (Krishna Institute of Medical Sciences) आणि इंडिया पेस्टीसाइड्सला (India pesticides limited) अनुक्रमे 28 आणि 30 एप्रिल रोजी नियामक मंडळाकडून परवानग्या मिळाल्या आहेत. ज्या कंपन्यांना बाजारातून पैसा उभा करायाचा आहे. त्यांना IPO हा चांगला पर्याय असतो. त्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते.
किती शेअर्सचा IPO असण्याची शक्यता
इंडिया पेस्टीसाइड्सच्या 800 कोटीच्या IPOमध्ये 100 कोटी नवीन शेअर्स जारी करण्यात येणार आहे. तसेच कृष्णा इंस्टिट्यूट 200 कोटीपर्यंतचे शेअर जारी करणार आहे.
कंपन्यांच्या बाबतीत
इंडिया पेस्टीसाइड्स ही उत्तर प्रदेशातील कंपनी आहे. ही कंपनी संशोधन आणि विकासवर आधारीत कृषी रसायन उद्योजक कंपनी आहे.
कृष्णा इंस्टिट्यूट ही आंध्र प्रेदश आणि तेलंगानामधील रुग्णालय साखळी असणारी सर्वात मोठी कंपनी आहे. कृष्णा इंस्टिट्यूटच्या माध्यमांतून नऊ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांचे संचालन केले जाते.