Stock Pick | या स्टॉकमध्ये आत्ताच गुंतवा पैसा; सणासुदीच्या दिवसांमध्ये मिळेल बंपर रिटर्न्स
मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यात मोठी कमाई केली जाऊ शकते
मुंबई : फेस्टिव सिजनची सुरूवात होत आहे. येथून पुढे कोणते ना कोणते सण उत्सव देशात साजरे होत राहतील. पुढे रक्षाबंधन, नवरात्र, गणेश चतुर्थी, दसरा दिवाळी असे अनेक सण उत्सव आहेत. अशात देशातील उत्पादनाचा खप वाढतो. विशेषतः कंज्यूमर सेक्टर, लाइफ स्टाइल सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर आणि टुरिजम सेक्टरमध्ये मोठी डिमांड वाढणार आहे. त्यामुळे या सेक्टरशी संबधीत मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यात मोठी कमाई केली जाऊ शकते. मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ सेडानी यांनी 4 असे शेअरची निवड केली आहे. ते म्हणजे VIP Industries, Crompton Consumers, IRCTC, M&M होय. या शेअर्समध्ये पुढील 1 वर्षात चांगली प्रगती दिसू शकते.
सिद्धार्थ सेडानी यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शॉपिंग वाढेल. ग्राहकांची स्पेडिंग वाढेल. लाइफ स्टाइल प्रोडक्टची डिमांड वाढेल. ट्रॅव्हल आणि टुरिजम इंडस्ट्रीचा व्यवहार वाढेल. ऑटोमोबाईल सेक्टरला सुद्धा चांगली डिमांड येईल.दीपावली आणि दसऱ्याच्या दरम्यान गाड्यांची विक्री वाढते. त्यामुळे फंडामेंटल मजबूत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवता येतो.
VIP Industries
ही टुरिजम सेक्टरमधील लीडिंग कंपनी आहे. लॉकडाऊन शिथिल होणे आणि फेस्टिव सिजनमुळे कंपनीला चांगला फायदा होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये 2 वर्षात 50 टक्के महसूल वाढीचा अंदाज आहे. कंपनीचे जून तिमाहीमधील निकालदेखील उत्तम होते.
लक्ष्य: 568 रुपये
रिटर्न: 16 टक्के
Crompton Consumers
कंज्यूमर सेक्टरमधील लीडिंग कंपनी आहे. कंपनी फॅन, लाइटिंग आणि होम अप्लाएंसेस बनवते. यामुळे कंपनीचा मार्केट शेअर चांगला आहे.
लक्ष्य: 549 रुपये
रिटर्न: 21 टक्के
IRCTC
ही भारत सरकारची मिनी रत्न कंपनी होय. लॉकडाऊन खुले झाल्याने या कंपनीला फायदा होईल. रेल्वे सेवा सामान्य झाल्यानंतर कंपनीची कमाई वाढणार आहे. ही मजबूत फंडामेंटल असलेली डेट फ्री कंपनी आहे.
लक्ष्य: 2870 रुपये
रिटर्न: 7 टक्के
M&M
लक्ष्य: 940 रुपये
रिटर्न: 19 टक्के
महिंद्रा ऍंड महिंद्रा ऑटोमोबाईल सेक्टरमधील लीडिंग कंपनी आहे. कंपनीचा सणासुदीच्या काळात व्यापार वाढतो. सध्या कंपनी इलेक्ट्रिक वाहनांमध्येही गुंतवणूक करीत आहे.