मुंबई : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं एखाद्या सट्ट्यापेक्षा कमी नसतं असं राजर्षिता म्हणतात. पैशाच्या लोभामुळे अनेकजण सर्व कमाई हरवून बसतात. राजर्षितानेही जास्त कमाई करण्याच्या नादात futures and option मध्ये पैसे गमावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगल्या पगाराची बँकेची नोकरी कोण सोडू इच्छितं? परंतू जगात अशीही लोकं आहेत ज्यांचं स्वप्न वेगळं होतं. कोलकत्त्यात राहणारी राजर्षिता सुर यांची गोष्ट देखील अशीच काहीशी आहे. जगभ्रमंती करणं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी नोकरीची चिंता केली नाही. सुर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केटने मदत केली. 


राजर्षिता यांचं स्वप्न
राजर्षिता सुर यांना मुंबईत एका प्रसिद्ध खासगी बँकेत चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली होती. परंतू नोकरीमुळे त्यांना हवं तेव्हा हवं तिथे फिरता येत नव्हतं. तिला असं काही काम करायचं होतं. की ज्याला वेळेचं बंधन नसेल आणि कमाईदेखील होत राहील. जेणे करून खर्च भागवता येऊ शकतो. त्यामुळे तिने स्टॉकमार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला. 


शेअर मार्केटमध्ये सुरूवात
राजर्षित सुर यांनी बँकेची नोकरी सोडल्यानंतर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली. सुरूवातीला एका कॉर्पोरेट फर्मसोबत तीन वर्षापर्यंत प्रॉपरायटरी इक्विटी ट्रेडर म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव होता. हळू हळू राजर्षिताला शेअर मार्केटची चालीचा अंदाजा आला होता. नोकरी दरम्यान ट्रेडिंग करून तिने चांगला परतावाही मिळवला. नंतर तिने नोकरी सोडून दिली. आणि जगभ्रमंतीला निघाली.


राजर्षिताची ओळख एक इनवेस्टमेंट गुरू म्हणून झाली. त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यात 8 वर्ष झाले आहेत. राजर्षिता सुर आतापर्यंत ब्रिटेन, टर्की, दक्षिण पूर्व आशिया आणि साधारण 70 टक्के युरोपात फिरल्या आहेत. 


नुकतेच त्यांनी नेपाळची ट्रिप केली होती. आता केनिया आणि आईसलँड येथे जाण्याच्या तयारीत आहेत. राजर्षिता दरवर्षी विदेश फिरण्यासाठी 10 लाख रुपये वेगळे काढून ठेवते. त्यांचे म्हणणे आहे की, ते 3-4 महिने कमाईचे टार्गेट ठेवते. जसे की, टार्गेट पूर्ण झाले. ती ट्रेडिंग बंद करून भ्रमंती करायला निघते. 


राजर्षिता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती मिळते की, त्यांना फिरण्याची किती आवड आहे ती... त्यांच्या बायोमध्ये लिहलंय की, फॉरएवर ऑन वॅकेशन.


जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या लोभामुळे अनेक लोकं सर्व कमाई गमावून बसतात. राजर्षिता यांनी देखील जास्त पैसे कमावण्याच्या लोभामुळे एफ ऍंड ओ सेगमेंटमध्ये पैसे गमावले आहेत. परंतू त्या या चुकांमधून शिकल्या आणि ट्रेडिंगपेक्षा लॉंग टर्म इन्वेस्टमेंटवर फोकस करणे सुरू केले.