मुंबई : Stocks in News : शेअर मार्केटमध्ये बक्कळ कमाई करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे महत्वाचे असते. अनेक स्टॉक किंवा कंपन्या चर्चेत असतात. त्यांच्याविषयी काहीतरी बातम्या सुरू असतात. त्यामुळे असे स्टॉक मार्केटमध्ये ऍक्शनमध्ये असतात. स्टॉकचे फंडामेंटल्स चांगले असतील तर अनेक गुंतवणूकदार लगेच स्टॉकवर ट्रेडिंग करतात. किंवा शॉर्ट-लॉंगटर्म गुंतवणूक करतात. त्यामुळे आज कोणते शेअर बातम्यांच्या आधारावर चर्चेत आहेत. हे पाहणं गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे असते. पाहूयात आज कोणते शेअर चर्चेत आहेत ते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाचे ट्रिगर्स


AMFI सहामाई  रिव्यू लिस्ट आज जारी केली जाईल. या यादीत कोणते स्टॉक सामिल होऊ शकतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.


Kesoram Indच्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. पार्टली पेड शेअरच्या फायनल कॉलचा शेवटचा दिवस आहे.


Maricoचा स्टॉक देखील सध्या चर्चेत आहे. कंपनीच्या उत्पादनांचा खप कमी झाला आहे. महागाई वाढल्याने डिस्पोजेबल उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परंतू उत्पन्नात 10 टक्के वाढदेखील झाली आहे.


Hindustan Zincचा स्टॉक चर्चेत आहे. सेलेबल मेटलचे उत्पादन 2.61 लाख टन झाले. डिसेंबरमध्ये त्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली.


HDFC Ltdच्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 7470 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.


Maruti Suzuki  स्टॉकवरही गुंतवणूकदारांची नजर असेल. डिसेंबरमध्ये कंपनीचे एकूण उत्पादन 1.9 टक्क्यांनी घसरले.


Ajmera Realty च्या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकते. कंपनीला मुंबईत निवासी पुनर्विकास प्रकल्प मिळाला आहे. जुहूमध्ये 30 हजार स्क्वेअर फूट टॉवर बांधणार आहे.