मुंबई : Stocks in News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून किंवा ट्रेडिंग करून चांगली कमाई करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे महत्वाचे असते. अनेक स्टॉक किंवा कंपन्या चर्चेत असतात. त्यांच्याविषयी काहीतरी बातम्या माध्यमांमध्ये असतात. अशा स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर असते. त्यांचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल चार्टचा अभ्यास करून गुंतवणूकदार ट्रेड किंवा गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे आज कोणते शेअर बातम्यांच्या आधारावर चर्चेत आहेत. हे पाहणं गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे असते. पाहूयात आज कोणते शेअर चर्चेत आहेत ते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आहेत आजचे ट्रिगर


ICICI Prudential MF  चा सिल्व्हर ETF आज उघडणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली कमाईची संधी आहे. हा ETF 19 जानेवारीपर्यंत खुला असणार आहे.


Voadfone Ideaचा शेअर चर्चेत आहे. टीडीसॅटच्या आदेशाविरोधात ट्रायच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


Spandana Sphoortyचा स्टॉक आज ऍक्शनमध्ये दिसेल. ही कंपनी आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करत आहे.


Bajaj Financeचा शेअर ऍक्शनमध्ये दिसू शकतो. कंपनीची AUM 26.3 टक्क्यांनी वाढून 1,81,300 कोटी झाली आहे.


Bandhan Bankच्या शेअरदेखील चर्चेत आहे. ग्राहकांनी बँकेकडे घेतलेले कर्ज आणि अॅडव्हान्स 11 टक्क्यांनी वाढले आहेत. एकूण ठेवींमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


AU Small Finance Bank च्या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये 49 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेत दरवर्षी 26.5 टक्क्यांनी वाढ दिसून येत आहे.


Dr Reddy's चे शेअर्स ऍक्शनमध्ये दिसू शकतात. ऍंटी कोविड Molflu ची किंमत 35 रुपये प्रति कॅप्सुल निश्चित करण्यात आली आहे.


Bharti Airtel चा शेअर चर्चेत आहे. कारण कंपनीने कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याची योजना रद्द केली आहे.


Thermax च्या शेअरवर नजर असणार आहे. 2FGD सिस्टिमसाठी 545.6 कोटींची ऑर्डर मिळाली आहे.