आग्रा : जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्र्यातल्या ताजमहालाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसलाय. ताजमहालाचाचं रॉलय गेटचा १२ फुटी स्तंभ कोसळलाय. तर दक्षिण प्रवेशद्वाराचा ८ फुटी खांबही या तडाख्यात जमीन दोस्त झालाय.  त्याचप्रमाणे ताज महाल परिसरात अनेक झा़डंही या वादळात उन्मळून पडली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळ आलं, त्यावेळी ताजमहालाच्या परिसरातून पर्यटक निघून गेलेले असल्यानं जीवित हानी टळलीय. वादळानं नेमकं किती नुकसान झालंय याचा तूर्तास अंदाज आलेला नाही. दरम्यान याच वादळाच्या तडख्यात आग्र्यातील पाच जणांचा बळी गेलाय. तर २४ हून अधिक लोक वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेत.