Street Food Vender Viral Video: समोसा, वडा किंवा जिलेबी असो, रस्त्यावरचे पदार्थ (Street Food) आपण अगदी चवीने खातो. आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण रस्त्यांवरच्या पदार्थांचा मनमुराद आनंद घेत असतो. हे पदार्थ दिसायला चविष्ट असले तरी ते आरोग्यासाठी मात्र हानिकारक ठरू शकतात. काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील दुषित पाण्यात एका गाडीवरील व्यक्ती प्लेट धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून किळस तर येईलच पण संतापही आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होणारा हा व्हिडिओ रस्त्यावरच्या एका स्टॉलवरचा आहे. समोसा आणि जिलेबी विकणाऱ्या एका स्टॉलवर मिठाईवाल्याने केलेलं घाणेरडं कृत्य एका जागरुक नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केलं आहे. 


मिठाईवाल्याचं किळसवाणं कृत्य 
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका स्टॉलवर समोसे आणि जिलेबी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं दिसतंय. तर एक व्यक्ती समोसे आणि जिलेबी तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झाऱ्याने स्वत:ची पाठ खाजवताना दिसतोय. एका जागरुक नागरिकाने आपल्या मोबाईलने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये टिपला आहे.



सोशल मीडियावर संताप
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला असून अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या स्टॉलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या मिठाईवाल्याला तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रस्त्यावरचं खात असाल तर आरोग्याची काळजी घ्या.