नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले आहेत. यूपी, हरयाणा आणि दिल्लीत हे धक्के जाणवले आहेत. साधारण साडे आठ वाजता हे धक्के बसले आहेत. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाहीये. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली, हरयाणा आणि यूपीमध्ये ५.० रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र देहरादूनपासून १२१ किलोमीटर दूर होतं. या भूकंपामुळे अनेक लोक घराबाहेर पडले आहेत. 


दिल्ली आणि एनसीआरमध्ये रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच, यूपीच्या मुरादाबाद आणि परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमध्ये चमोली, उत्तरकाशी, नवीन टिहरी, देहरादून आणि हरिद्वारमध्येही भूकंपाचे धक्के बसले.