Student Answer Sheet : लहान मुलांच्या परीक्षेचे फोटो हे अनेक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्हाला कल्पना येणार नाही परंतु यावेळी चक्क टीचर त्या मुलाला असा रिमार्क दिला की तुम्हाला वाचून हसू तर येईलच परंतु धक्का बसल्याशिवायही राहणार नाही. खरंतर लहान मुलांची बुद्धी ही आजकाल फारच तल्लख आहे असं आपण म्हणतो. आपल्यापेक्षाही ही मुलं प्रचंड हुशार आहेत असा चर्चाही सोशल मीडियावर रंगलेली असते. त्यातून आता अशाच एका मुलाच्या उत्तरपत्रिकेनं सर्वांचीच झोप उडवून टाकली आहे. त्यानं जे लिहिलंय ते पाहून टीचरनं अक्षरक्ष:त्याला शून्य मार्क तर दिले आहेत. परंतु त्याचसोबत त्याच्या खाली त्यांनी रिमार्क दिला आहे की टीचर कोमोत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या व्हायरल फोटोची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी नक्की काय घडलंय हे आपण पाहुयात. खरंतर लहान मुलांच्या हस्ताक्षरापासून ते अगदी त्यांच्या उत्तरांपर्यंत विविध गोष्टी या आपल्याला हसवू शकतात. त्यातून आता हल्ली अशाप्रकारे पोट भरून हसवणारे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होयला फार वेळही लागत नाही. प्रश्नपत्रिका समोर आली की त्याखाली ही लहान मुलं काय लिहितील याचाही काहीच शाश्वती नाही. त्यातून त्यांच्या उत्तरपत्रिकेतही अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की त्या वाचूनच आपल्याला धक्का बसतो. 


सध्या व्हायरल होणाऱ्या उत्तर प्रत्रिकेत एका लहान मुलानं जे लिहिलंय ते पाहून शिक्षकांना धक्काच बसला आहे. यावेळी त्याचे उत्तर हे एका ठिकाणाहून सुरू होते ते कुठच्या कुठे पोहचते. सतलज नदीवर धरण बांधले असल्याचे तो यावेळी लिहितो. मग पुढे अगदी हे धरणं कुठे आहे ते जिथे हे धरणं आहे ते राज्य कोणतं आणि मग त्यानंतर तो अगदी सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, टाटा-बाय बाय, साखर, लंडन, जर्मनी अगदी महायुद्धापर्यंत पोहचतो आणि मग परत तो सतलज धरणाकडे येतो. त्याची ही जबरदस्त शैली पाहून शिक्षक तर कोमातच जातात. त्याला चक्क 10 पैंकी 0 मार्क्स देतात आणि लिहितात की टीचर कोमात आहे. 



सध्या या फोटोखाली नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. नेटकरीही या फोटोखाली नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. भाक्रा नागल प्रकल्पावर या मुलाला प्रश्न विचारण्यात आला आहे.