मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक अशा गोष्टी मिळतात. ते बराच काळ ट्रेंड होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ ट्रेंड होत आहे. जो एका अपघाताचा आहे. ज्यामध्ये एका 19 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. विद्यार्थी मित्रांसोबत हायस्पीड ट्रेनमध्ये स्टंट करत असताना हा वेदनादायक अपघात घडला. खरंतर स्टंट करताना या विद्यार्थ्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनमधून पडला. या घटनेपूर्वी विद्यार्थ्यांनी बनवलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई, तामिळनाडू येथे या19 वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांसोबत ट्रेनमध्ये स्टंट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनमधून पडला. नीती देवन असे या विद्यार्थ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.


हा तरुण तिरुविलंगडू येथील रहिवासी आहे आणि तो प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये बीए इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत होता.


अपघातापूर्वी विद्यार्थ्यांनी स्टंटचा व्हिडीओही बनवला गेला होता. ज्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, तो स्वत: हा स्टंट करत होता, त्या दरम्यान त्याचा पाय घसरुन ही घटना घडली. देवन हा वेलाचेरीहून अरक्कोनमला जात होता, असे सांगण्यात येत आहे. त्यावेळी वाटेत तो मित्रांसोबत ट्रेनमध्ये स्टंट करू लागला.


या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु काही गाईडलाईन्समुळे हा व्हिडीओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीय.


गंभीर जखमी झालेल्या देवनला तत्काळ तिरुवल्लूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताबद्दल दक्षिण रेल्वेने शोक व्यक्त केला आहे. तो धोकादायक स्टंट करू नका, असा सल्ला विभागीय व्यवस्थापकांनी प्रवाशांना दिला आहे.