Agniveer scheme boy Fail In Exam : देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या (Educated youngster) हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत. त्यात आता एका तरूणाने अग्निवीर परिक्षेत (Agniveer Exam)  नापास झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने अग्निवीर स्किम (Agniveer scheme) लॉंच केली आहे.या स्किम अंतर्गत तरूणांना लष्करात भरती होता येणार आहे. फक्त 4 वर्षच ही नोकरी करता येणार आहे. या नोकरीच्या बदल्यात त्यांना पगार आणि इतर सोयीसुविधा मिळणार आहेत. त्या अंतर्गत आता अग्निवीरांच्या परीक्षा (Agniveer Exam) घेतल्या जात आहेत. या परीक्षेत नापास झाल्याने एका तरूणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.  


तणावातून टोकाचं पाऊल 


दीपू नावाच्या 19 वर्षीय तरूणाने नुकतीच अग्निवीरची परीक्षा (Agniveer Exam) दिली होती. 30 जानेवारीला या परीक्षेचा निकाल लागला होता. या निकालात तो नापास झाला होता. या निकालापासून तो तणावात होता. या तणावातून त्याने राहत्या घरीच आयुष्य संपवलं.या घटनेनंतर तरूणाच्या शेजारी तीन पानी नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्याबाबतच कारण लिहलं आहे. 


घटनास्थळी नोट सापडली


पोलिसांना घटनास्थळी एक नोट सापडली आहे. या नोटमध्ये लिहलेय की, “मी चार वर्षे खूप मेहनत केली, पण काहीही साध्य झाले नाही. मला माझ्या आई-वडिलांचे नाव रोशन करता आले नाही.या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मी नक्कीच सैनिक होईन. तसेच दिपू पुढे भावाला उद्देशून लिहतो की, 'माझे स्वप्न भंगले, आता काय करावे?' 'मी सैनिक बनू शकलो नाही, पण तू नक्की बन, आईवडिलांची काळजी घे. 


पोलिस काय म्हणाले?


अलीगढचा रहिवासी असलेला 19 वर्षीय दीपू लहान भाऊ अमन आणि मावशीचा मुलगा अंशूसोबत बरौला येथे राहत होता. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडामध्ये राहून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होते.मात्र अग्निवीर परीक्षेत  (Agniveer Exam)दीपू नापास झाला होता. त्यामुळे तो तणावात होता.या तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलंल. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे, अशी माहिती नोएडा झोनचे अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी दिली आहे. 


दरम्यान ही घटना नोएडा येथील सेक्टर-49 येथील बरौली गावात घडली आहे. तर दीपू हा अलिगढचा रहिवाशी होता. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.