नवी दिल्ली : बीकॉमच्या (ऑनर्स) एका पुस्तकात चक्क विद्यार्थ्यांना 'स्कर्ट'प्रमाणे ई-मेल छोटा असावा, अशी शिकवण देण्यात येतेय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेसिक बिझनेस कम्युनिकेशन' नावाचं हे पुस्तक दिल्ली युनिव्हर्सिटीशी संबंधित एका महाविद्यायाच्या वाणिज्य विभागाचे माजी प्रमुख सी.बी.गुप्ता यांनी लिहिलंय... या पुस्तकाचं प्रकाशन जवळपास एक दशकभरापूर्वी झालंय. 


'ई-मेल संदेश स्कर्टप्रमाणे छोटा असायला हवा. इतका छोटा की त्यामध्ये रुचि कायम राहायला हवी आणि इतका लांब असावा की त्यात महत्त्वाचे मुद्द्यांचा उल्लेख असावा' असं यात म्हटलं गेलंय. 


या पुस्तकावरून वाद उभा राहिल्यानंतर कुणाच्या भावनांना धक्का लागला असेल तर क्षमा असावी, असं प्रोफेसर गुप्ता यांनी म्हटलंय... ही उपमा एका परदेशी लेखकाकडून घेतली गेल्याचंही त्यांनी म्हटलंय. मी माझ्या पुस्तकातून हा उल्लेख हटवलाय... प्रकाशकांनाही याबाबत सूचना दिलीय... नव्यानं छापण्यात येणाऱ्या पुस्तकांतून हे हटवलं गेलं असेल, असंही त्यांनी म्हटलंय.