नवी दिल्ली : Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दोघांनी एकच व्हिडिओ शेअर करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरुण यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्याच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यातून कुठेतरी युक्रेनच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र असल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी तर प्रत्येक संकटात संधी शोधू नये, असे म्हटले आहे.


Operation Ganga झाला उशीर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार ऑपरेशन गंगा  (Operation Ganga) चालवत आहे. तथापि, या ऑपरेशनमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण रशिया आणि ब्रिटनच्या सैन्यांमध्ये सतत गोळीबार होत आहे. सरकारने उशिरा पाऊल उचलले. त्यामुळे भारतीय विद्यार्थी वेळेवर परत येऊ शकलेले नाहीत, असे विरोधकांना वाटते.



काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या दिरंगाईबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रभावी पावले उचलत नसल्याचा आरोप करत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, असे म्हटलेय. केंद्र सरकार त्यांच्या परतीसाठी काहीही करणार नाही, प्रभावी पावले उचलत नसल्याचे सांगितले. 


योग्य वेळी निर्णय घेतला नाही?



राहुल गांधी यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांनीही त्यांच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलेय, योग्य निर्णय न घेतल्याने प्रचंड गोंधळात 15 हजारांहून अधिक विद्यार्थी अजूनही युद्धभूमीत अडकले आहेत. ठोस धोरणात्मक आणि मुत्सद्दी कारवाई करून त्यांना सुरक्षित परतणे हे त्यांच्यावर उपकार नसून ती आपली जबाबदारी आहे. प्रत्येक संकटात 'संधी' शोधता कामा नये, असे वरुण यांनी म्हटलेय.