पोपट पिटेकर, मुंबई : मार्क कमी दिल्यानं शिक्षक आणि विद्यार्थींमध्ये अनेक शाब्दीक वादविवाद होत असतात. परंतू झारखंडमध्ये अत्यत धक्कादायक घडना समोर आली आहे. झारखंडमधील दुमका येथे शिक्षिकेला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. कमी मार्क दिल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला बेदम मारहाण केली. विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला झाडाला बांधून ही मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार झारखंडच्या गोपीकंदर पोलीस स्टेशन हदीत घडलाय. परीक्षेत कमी गुण दिल्याच्या आरोपावरून इयत्ता 9 वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी गणिताच्या शिक्षिका आणि शाळेतील लिपिकाला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.


झारखंड शैक्षणिक परिषदेनं जाहीर केलेल्या इयत्ता 9वीच्या परीक्षेत शाळेतील 32 पैकी 11 विद्यार्थ्यांनी ग्रेड-डी मिळवली. जो अनुत्तीर्ण मानला जातो. या प्रकरणी शाळेकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेलं नाही. 


सुमन कुमार नावाच्या शिक्षिकेला आणि सोनराम चौरे नावाच्या लिपिकाला मारहाण केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेला गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. मात्र शाळेतील व्यवस्थापकाने तक्रार करण्यास नकार दिला. कारण तक्रास दिल्यास विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि करियर खराब होईल.


ज्या शाळेत हा प्रकार झाला. त्या शाळेत 200 विद्यार्थी आहेत. बहूतक सर्व विद्यार्थी हे घडलेल्या प्रकारात सामिल होते. विशेष म्हणजे मारहाण करण्यात आलेल्या शिक्षिका या माजी मुख्याध्यापिका होत्या. मात्र काही कारणामुळे त्यांना त्या पदावरुन हटवण्यात आलं होतं. या घटनेमुळे शाळेतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर  केली आहे.


शिक्षकांनी प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण दिल्याने ते परीक्षेत नापास झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. याप्रकरणी JAC च्या साइटवर ऑनलाइन गुण अपलोड करण्यासाठी लिपिक जबाबदार असल्याचं समोर आलंय.