भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अखेर अटक
अखेर सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हरियाणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत त्याला अटक केली.
चंदिगड : अखेर सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हरियाणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत त्याला अटक केली.
चंदिगडच्या आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार यांच्यावर आहे.
पोलीस आणि सरकार विकासला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधकांनी केल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याच्याविरोधात गंभीर कलमं लावत त्याला बेड्या ठोकल्या. ज्याठिकाणी घटना घडली तिथली सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना ताब्यात घेतलं असून, त्यात दोघांविरोधात पुरेसा भक्कम पुरावा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.