जयपूर : Rajya Sabha Elections News : डॉ. सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत म्हणून अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह, राजस्थान भाजप अध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड, माजी मुख्ममंत्री वसुंधरा राजे उपस्थित होते. (Subhash Chandra filed his nomination for the Rajya Sabha elections in Rajasthan )


दरम्यान, डॉ. सुभाष चंद्रा यांनी राजस्थान विधानसभेतील भाजप आमदारांची भेट घेतली. भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह, राजस्थान भाजपा अध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. तसेच डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार केला.