नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर लोकं रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. वास्तविक रिया आणि तिचे कुटुंब सीबीआयच्या रडारवर आहेत. या कारणास्तव, लोकं रियाच्या अटकेची अपेक्षा करत आहेत. याच अनुषंगाने आज माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'रिया चक्रवर्ती जर महेश भट्ट यांच्याशी झालेल्या संभाषणाला विरोध करणारे पुरावे देत असेल तर सत्य शोधण्यासाठी सीबीआयला अटक आणि त्यांना ताब्यात घेण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरणार नाही.'



सीबीआय रियाला चौकशीसाठी बोलवू शकते. या प्रकरणात, रियाला सीबीआय अनेक प्रश्न विचारु शकते. विशेष म्हणजे रिया ईडी कार्यालयातही दोनदा चौकशीसाठी गेली आहे. रियासोबत तिचा भाऊ आणि वडीलही होते.