नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेतृत्वावर नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाला रामराम केला. पाटणा इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्र मंचच्या कार्यक्रमात आपण राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा सिन्हा यांनी केली. दरम्यान, यशवंत सिन्हांच्या जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही, असं ज्येष्ठ भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय.. 


काय म्हणाले सिन्हा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण संन्यास घेत असून भाजपाशी असलेले सर्व संबंध तोडत असल्याचं सिन्हा यांनी जाहीर केले. मी काही वर्षांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पण, आता मी भाजपतून बाहेर पडत आहे. मी कोणत्याही पक्षात सहभागी झालो नाही. पण, या पुढे देशासाठी काम करत राहणार असल्याचेही यशवंत सिन्हा म्हणाले.


कुठे केली घोषणा?


राष्ट्र मंचच्या या कार्यक्रमात सिन्हा यांनी ही घोषणा केली. राष्ट्र मंचच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यशवंत सिन्हांसह भाजपा खासदार शत्रुध्न सिन्हा हेदेखील व्यासपीठावर हजर होते.