Success Story IAS Manuj Jindal: प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ येतो जेव्हा सर्वकाही संपलंय असं वाटतं. पण या परिस्थितीवर मात करत जे पुढे जातात ते भविष्यात फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतात. यूपीएससी देणाऱ्या अनेक तरुणांच्या कहाण्या संघर्षाने भरल्या आहेत.IAS मनुज जिंदाल यांनी यूपीएससीमध्ये ऑल इंडिया 53 वा रॅंक मिळवला. पण इथपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. मधल्या काळात ते नैराश्याचा शिकार झाले होते. आयुष्यात हरले होते पण पुन्हा लढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए केडरदेखील आहेत. जिथे मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी एनडीएमध्ये प्रवेश केला.


एनडीएतून वगळले 


प्रशिक्षणादरम्यान मनुज यांनी पहिल्या टर्ममध्ये चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. ते नैराश्याचे शिकार ठरले. दिवसागणिक त्यांची प्रकृती खालावत गेली. यानंतर एनडीएतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.


नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय 


यानंतर मनुज यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ठरवले. व्हर्जिनिया विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांना बार्कलेजकडून ऑफर मिळाली. जिथे 3 वर्षे त्यांनी चांगल्या पगाराच्या पॅकेजवर काम केले. 


अंतिम यादीत स्थान नाही


मनुज यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांचा धाकटा भाऊ यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत होता. मनुजनेही परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. ते 2014 मध्ये परीक्षेला बसले. प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर केली पण अंतिम यादीत स्थान मिळवता आले नव्हते.


ऑल इंडिया 53 वा रॅंक


हरणं आणि पुन्हा प्रयत्न करणं हे त्यांच्यासाठी नेहमीचच झालं होतं. दुसऱ्या प्रयत्नात ते परीक्षा उत्तीर्ण झाले पण अंतिम निकालाच्या राखीव यादीत होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 2017 मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली. यात त्यांना ऑल इंडिया 53 वा रॅंक मिळवला.


आयुष्यातील अनुभवांवर पुस्तक


आपल्या अनुभवावर त्यांनी 'असेसिंग द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग' नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते आयएएस मनुज हे एक युट्यूब चॅनल देखील चालवतात. ज्यामध्ये ते लोकांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा कशी द्यावी, याबद्दल ते मार्गदर्शन करतात.