Success Story: प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही, असं आपल्याकडे म्हटलं जातं. कोणत्या आमिशाला बळी न पडता खडतर परिस्थितीवर मात करत जे आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवतात, ते एक ना एक दिवस यशाला गवसणी घालतात. झारखंडच्या इरफानच्या बाबतीतही हे खरे ठरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडील भंगार वेचण्याचे काम करायचे, आई देवाघरी गेलेली..घरची परिस्थिती तशी बेताचीच पण आज इरफानला गुगलने नोकरीची ऑफर दिली आहे. बोकारोच्या गोमिया ब्लॉकच्या आयईएल मस्जिद मोहल्ला येथील रहिवासी हाजी अब्दुल कादिर भाटी यांचा मुलगा इरफान भाटी याने हे यश मिळवले आहे. त्याने  गुगल लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळवली आहे. 


इरफान भाटी हा 29 ऑगस्टला लंडनला रवाना होणार आहे. याआधी इरफान भाटी गुगल इंडियामध्येच काम करत होता. जिथे त्याला 40 लाखांचे पॅकेज दिले जात होते. परंतु इरफान भाटीचे लक्ष्य आणखी मोठे आहे. त्यामुळे तो आता लंडनला उड्डाण करणार आहे. आता गुगलने त्याला एक कोटी 20 लाखांचे पॅकेज ऑफर केले आहे. या यशाचे श्रेय त्याने आपले आई-वडील आणि कुटुंबीयांना दिले आहे.


Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या


इरफान भाटीने 2014 मध्ये पिट्स मॉडर्न स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केले.  त्याने पश्चिम बंगालमधील हल्दिया येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, 2019 मध्ये, बायजू आणि फ्लिपकार्टमध्ये सुमारे दीड वर्षे काम केले.दरम्यानच्या काळात इरफानची आई रुखसानाचे निधन झाले. यामुळे तो खूप दु:खी झाला होता. मात्र घरच्यांनी त्याला साथ दिली. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.


गुगलमध्ये नोकरीसाठी इरफान याने सर्वप्रथम ऑनलाइन मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तो पास झाला आणि त्याला गुगल इंडियामध्ये नोकरी मिळाली. सुरुवातीला तो गुगल मॅपसाठी काम करत होता. सुमारे अडीच वर्षे त्यांनी बंगळुरूमध्ये काम केले. यानंतर त्याला गुगल लंडनमध्ये नोकरी मिळाली. मी गुगलमध्ये अॅप्लिकेशन बनवण्याचे काम करणार असल्याचे त्याने सांगितले. 


इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन


मुलाच्या या यशाने मला खूप आनंद झाला आहे. मला आपल्या मुलाचा अभिमान असल्याचे इरफानचे वडील हाजी अब्दुल कादिर भाटी यांनी सांगितले. इरफानचे वडील 1965 मध्ये राजस्थानहून गोमियाला आले. तेथे त्यांना आयईएल कंपनीत भंगार उचलण्याचे काम मिळाले होते. तेव्हापासून कुटुंब गोमियाला स्थायिक झाले. परिस्थितीवर मात करत उत्तूंग यश मिळवणाऱ्या इरफानचे सगळीकडून कौतुक होत आहे.