Success Story: शेतकऱ्याच्या आयुष्याला संघर्ष पुजलेला असतो. त्यामुळे असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द त्याच्याकडे असते. हीच प्रेरणा शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही उतरताना दिसते. शेतकऱ्याच्या मुलाची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. यात शेतकऱ्याच्या मुलाने परिस्थितीतीवर मात करत सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा अंतिम निकाल संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. .यात सुनील कुमार मीना यांनी या परीक्षेत 187 वा क्रमांक मिळवला. त स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव उंचावले आहे. सुनील कुमार शेतकरी कुटुंबातून आले असल्याने त्यांच्या यशाच सर्व स्तरातून कौतुक होतंय. कारण त्यांनी कोणतेही कोचिंग न लावता या परीक्षेची तयारी केली.


सेल्फ स्टडीचा आधार


कोणत्याही सोयी सुविधा हाती नसताना सेल्फ स्टडी करुन देखील यूपीएससी उत्तीर्ण करता येते हे सुनील यांनी दाखवून दिले.  यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग संस्थेची मदत घेतली नाही. कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर सुनील यांनी हे स्थान मिळवले आहे.


सुनील कुमार मीना हे राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील राहराई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव भौर्य मीना आणि आईचे नाव हरप्यारी आहे.  त्यांना 6 भावंडे आहेत. सुनील यांचा मोठा भाऊ रामवीर मीणा हे वाहतूक निरीक्षक म्हणून तर राजवीर रेल्वेत लोको पायलट म्हणून तैनात आहेत. त्यांचा एक भाऊ, सत्यप्रकाश आणि दोन बहिणी, रेवती आणि रेशम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.


भाड्याच्या खोलीत राहून यूपीएससीची तयारी


सुनील कुमार यांनी जवाहर नवोदय विद्यालयातून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी किरोरी माल महाविद्यालयातून बीए पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या भूगोल विद्याशाखेतून एमए केले. 


येथे सुनिल अभ्यासासाठी भाड्याच्या खोलीत राहत असत. अभ्यासासोबतच त्यांनी यूपीएससीची तयारीही सुरू केली. त्यांनी अभ्यासासाठी स्वयंअध्ययन आणि ग्रंथालयाचा आधार घेतला. यामुळे त्यांनी मिळवलेले यश हे असामान्य आहे.