Suchana Seth Goa Child Murder: गोवा येथील एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या बेंगळुरु येथील एका कंपनीची सीईओ सूचना सेठ सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. महिलेला अटक करणे हो पोलिसांसाठी आव्हान होतं. मात्र, काही घटनांमुळं पोलिसांना सूचनापर्यंत पोहोचणे शक्य झाले. गोवा बॉर्डरवर घडलेल्या एका दुर्घटनेमुळं पोलिस सूचना सेठपर्यंत पोहचू शकले आहेत. खरं तर या मुळंच  सूचनाला पकडणे शक्य झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ जेव्हा गोव्याहून बेंगळुरु येथे पळून जात होती. तेव्हा एका अपघातामुळं तिची कॅब चोरला घाटात चार तासांपर्यंत अडकून पडली होती. ही दुर्घटना खरं तर पोलिसांना केसच्या तपासासाठी वरदानच ठरली. कारण जर सूचना बेंगळुरु येथे पोहोचली असती तर तिने मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असती आणि पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला नसता. त्यामुळं केस अधिक किचकट झाली असती. चोरला घाट हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेलगत आहे. हा घाट पणजीच्या उत्तर-पूर्वमध्ये आणि कर्नाटकच्या बेळगावपासून 55 किमी अंतरावर आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट रमण हे दोघेही 2022 पासून वेगळे राहत होते. कोर्टात त्यांची घटस्फोटाची केस सुरु आहे. कोर्टाने रमणला दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, यामुळं सूचना विचलित झाली होती. त्यातूनच तिने मुलाला संपवले. सूत्रांनुसार, सूचनाने शनिवारी पती वेंकट रमणला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज केला होता. त्यात तिने लिहले होते की तुम्ही रविवारी त्याला भेटू शकता. मात्र, त्याचवेळी त्याला कळले की सूचना गोव्याला जाणार आहे त्यामुळं त्याने भेट रद्द करुन थायलंडला जाण्याचे ठरवले. तर, एकीकडे सूचना शनिवारीच मुलाला घेऊन गोव्याला गेली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना हत्येचा आरोप फेटाळत आहे. तिने केलेल्या दाव्यानुसार, मी झोपेतून उठली तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी तिच्या या दाव्यावर विश्वास दाखवला नाही. पोलिसांनी तिच्या खोलीत खोकल्याच्या औषधांच्या खूप बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळं तिने औषधाचा ओव्हरडोस दिला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मुलाची हत्या कशी करण्यात आली याचा खुलासा होणार आहे.