मुंबई : पंजाबच्या (Punjab) जलालाबादमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिरोमणी अकाली दलच्या (Shiromani Akali Dal) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. जलालाबाद (Jalalabad) नगरपरिषदेच्या निवडणुकी (local body elections) दरम्यान हा सगळा राडा झाला. यावेळी थेट विटा आणि दगडे एकमेकांवर भिरकावण्यात आले. तसेच गोळीबारही करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीतरी गडबड गोंधळ घातला जाऊ शकतो असा संशय आल्यानं खुद्द शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल कोर्ट परिसरात पोहोचले तेव्हाच राड्याला सुरुवात झाली. सुखबीर यांच्या गाडीवरही दगडफेक झाली. सुखबीर सुखरुप आहेत मात्र अकालीचे दोन कार्यकर्ते यात जखमी झालेत. काँग्रेसने (Congress workers ) उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा अकालीचा आरोप आहे.


पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 14  फेब्रुवारीला निवडणुका होत आहे. या निवडणुकीपूर्वी शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाली. दरम्यान, या हल्ल्याची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे , अशी मागणी करण्यात आली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्था आणि कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बादल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांसमवेत पाठिंबा दिला होता.  राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे आणि गृहखाते असलेले मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दलाकडून करण्यात येत आहे.