Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Heat Wave Record Broken in Februaryin : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा फेब्रुवारी (February Temprature) महिन्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात काय होईल अशी चिंता सर्वसामान्यांना सतावतेय. नवीन वर्षाची सुरुवात ही बोचरी थंडीने झाली. अनेक ठिकाणी थंडीचा कहर पाहिला मिळला. अनेक वर्षांचा रेकॉर्ड या थंडीने मोडला खऱ्या पण फेब्रुवारीत अचानक वातावरणात बदल झाला आणि सूर्याने उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच आपलं रौद्ररुप दाखवलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या उष्णतेने 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरी 29.5 डिग्री तापमनाचा (Temprature) नोंद झाली. (summer temprature 122 year heat record broken in February weather updates imd what will happen in March latest marathi news)
महाराष्ट्रात अंगाची होणार लाहीलाही! (Summer 2023 and Heatwaves)
यंदा भारतात उन्हाळा खूप कडक असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मार्च ते मे या काळात मध्य आणि लगतच्या वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वाढलेली आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान विशेषज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा तापमानाचा अंदाज सांगितला आहे.
तर हवामान विभागाच्या इशारानुसार मार्च 2023 मध्ये कमाल तापमान हे प्रायद्वीपीय भारत वगळता देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जेथे सामान्य ते सामान्य कमाल तापमानापेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर दक्षिण द्वीपकल्पीय भारत वगळता देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तर मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भाग, पूर्व आणि मध्य भारत, उत्तर पश्चिम भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
त्याचा अर्थ यंदा थंडीच्या लाटेनंतर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पाणी भरपूर प्रमाणात प्यावं. शिवाय उष्णघातापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी.