सुंजवान हल्ला : शुद्धीत आल्यानंतर मेजर अभिजीत यांचा `ह्रदयद्रावक` प्रश्न
जम्मू काश्मीरच्या सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेल्या मेजर अभिजीत यांना शुद्ध आली आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेल्या मेजर अभिजीत यांना शुद्ध आली आहे.
त्यांना उधमपुरमधील लष्करी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. शुद्धीत आल्यावर त्यांनी 'दहशतवाद्यांचे काय झाले?' असा पहिला प्रश्न विचारला.
शुद्धीत आल्यावर पहिला प्रश्न
सुंजवान लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान ते एवढे जखमी झाले की बेशुद्ध पडले. ३ ते ४ दिवस त्यांना बाहेरच्या दुनियेत काय चाललय याबद्दल माहित नव्हतं.
पण ऑपरेशननंतर शुद्धीत आल्यानंतरच्या पहिल्या प्रश्नाने सर्वांना अचंबित केले. न्यूज एजंसी 'एएनआय'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
जशास तसे उत्तर देणार
या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले. हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिले जाईल असे केंद्रीय सुरक्षा मंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.
तब्ब्येतीत सुधार
मेजर अभिजीत यांचे मनोबल खूप उंच आहे. त्या दहशतवाद्याचे काय झाले? असा शुद्धीत आल्यानंतरचा पहिला प्रश्न त्यांनी विचारला.
ते पुन्हा लवकर रुजू होण्यास उत्सूक आहेत. आता त्यांच्या तब्ब्येतीत सुधार पाहायला मिळत असल्याचे मेजर जनरल नादीप नैथानी यांनी एएनआयला सांगितले.