मुंबई : 31 जानेवारी 2018 या रात्रीचा अनुभव प्रत्येकासाठी खास असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी तितकीच दुर्मिळ अशी घटना आपल्याला आकाशात पाहायला मिळणार आहे. तब्बल 152 वर्षांनी खगोलातील महत्वाची घटना घडणार आहे. 31 मार्च 1866 नंतर होणाऱ्या सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्ससाठी जगातील सर्व खगोल शास्त्रज्ञ प्रेमी सज्ज झाले आहेत. भारतातून ही या ग्रहणाचा काही भाग दिसणार आहे. त्यामुळे खगोल प्रेमींनी सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स पाहण्याची संधी अजिबात सोडू नये. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स म्हणजे काय हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. 


चंद्रग्रहण म्हणजे काय? 


चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून पृथ्वीभोवती फिरताना ज्या कक्षेतून फिरतो. त्यात तो पृथ्वीजवळही येतो जेव्हा पेरीजीमध्ये असतो. साधारण 3,62,600 किमी तर एपोजी किंवा लांब अंतरावर असताना पृथ्वीपासून 4,05,400 किमीवर जातो. चंद्राचा प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. आपल्या कक्षेतून जाताना जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यालाच चंद्रग्रहण मिळतात. 


जेव्हा दोन पौर्णिमा एकाच महिन्यात येतात त्याला ब्लू मून असे म्हणतात, अशी परिस्थिती साधारण दोन ते अडीच वर्षात येत असते. पण याबरोबर आणखी एक गोष्ट जेव्हा अनुभवता येते तेव्हा याचे महत्व वेगळे असते.  हा भाग पृथ्वीजवळ आल्याने तो मोठा दिसतो. आणि या 31 जानेवारीला ही गोष्ट खास आहे कारण एकाचवेळी या तिन्ही गोष्टी दिसणार आहेत. 


सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स कसं दिसणार 


या नावाप्रमाणे चंद्र निळा दिसणार नाही. पण हा चंद्र तांबूस रंगाचा गोळा दिसणार आहे. पृथ्वी जरी आकाराने मोठी असली तरी चंद्रावर पृथ्वीची नेहमीच सावली पडेल असे नसते. त्याच्या कक्षेमुळे सावली ही उंब्रा आणि पेनुम्ब्रा अशा भागात विभागली जाते. यातील उंब्रा या भागात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पूर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव येतो. पृथ्वीची सावली चंद्राला पूर्ण झाकोळून टाकते तर पेनुम्ब्रा भागात असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण सावलीचा अनुभव येत नाही. 


कुठे दिसणार? 


हे सुपर ब्लू ब्लड मून मध्य आणि पूर्व आशियाभागात दिसणार आहे. इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील भरपूर भागात दिसणार आहे. तसेच आल्सका, हवाई आणि नॉर्दन वेस्टर्न कॅनडामध्ये हे अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत दिसणार आहे. 


किती काळ दिसणार? 


या सुपर ब्लू ब्लड मून 77 मिनिटे दिसणार आहे. 


यानंतर कधी दिसणार? 


तब्बल दीडशे नंतर दिसणारा हा सुपर ब्लू ब्लड मून 2018 नंतर 31 जानेवारी 2028 रोजी दिसणार असून 31 जानेवारी 2037 रोजी देखील दिसणार आहे.