नवी दिल्ली : एका बलात्कार पीडित १३ वर्षाच्या मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च नायालयाने मंजुरी दिली आहे. ही पीडित मुलगी ३१ आठवड्याची गर्भवती आहे. पीडित मुलीचे वय आणि तिला होणारा त्रास लक्षात घेता तिला गर्भपात करण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. 




 
 सुप्रीम कोर्टाच्या न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने या मुलीची  जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका  पॅनेलद्वारे वैद्यकीय तपासणी केली. या पॅनेलने  मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिच्या आरोग्याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला.  मुलीच्या वैद्यकीय अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने  मुलीचा गर्भपात करण्यास मंजुरी दिली. पीडित मुलीवर तिच्या वडिलांच्या परिचयातील २३ वर्षीय आरोपीने बलात्कार केला होता.