रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचा झाल्याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. नोटीशीला सहा महिन्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 


दीड महिन्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारला दीड महिन्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. बंदी असलेले कीटकनाशक का वापरले जातात याविषयी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली आहे. 


कीटकनाशक कंपन्याना परवानगी नेमकी कशी?


कीटकनाशक कंपन्यांच्या निर्मितीवर आणि परवानग्यांवर सरकारचं नेमकं कोणतं नियंत्रण आहे, किंवा नाही, आणि नियंत्रण आणण्यासाठी काय केलं जाणार आहे. याविषयी ही विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


अतिविषारी किटकनाशकांची फवारणी


महाराष्ट्रात ३० ते ३२ शेतकऱ्यांच्या अतिविषारी किटकनाशकांची फवारणी केल्याने मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर ही बाब पुन्हा चर्चेला आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या विषारी फवारणीचा फटका बसला आहे.