नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी चार न्यायाधीशांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या चार न्यायाधीशांना शपथ दिली. या चार नव्या न्यायाधीशांमध्ये न्या. हेमंत गुप्ता, न्या. आर सुभाष रेड्डी, न्या. एम आर शाह आणि न्या. अजय रस्तोगी यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चार न्यायाधीशांचा समावेश झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय. 


यापूर्वी गुरुवारी केंद्र सरकारनं सर्वोच्च कोर्ट कॉलेजियमची शिफारस मंजूर करत या चार न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. सरकारनं या नियुक्तीसंबंधी अधिसूचना जारी केली होती.


सर्वोच्च न्यायालयात अजूनही तीन न्यायाधीशांची कमी राहील कारण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांसाठी स्वीकृत पद ३१ आहेत.  


या नियुक्ती संदर्भात सर्वोच्च कोर्ट कॉलेजियमनं केंद्राला पाठवलेल्या शिफारस केली होती. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशिवाय न्या. मदन बी लोकूर, न्या. कुरियन जोसेफ, न्या ए के सीकरी आणि न्या. एस ए बोबडे यांचा समावेश होता.