मराठा आरक्षण सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court )पुढे ढकलली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court )पुढे ढकलली आहे. आता 8 मार्चपासून सुनावणी होणार आहे. 8 ते 10 मार्चला विरोधक आपली बाजू मांडू शकणार आहेत. तर 12 ते 17 मार्चपर्यंत राज्य सरकार बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाल आज होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु झाली आहे, गेल्या सुनावणीत व्हीडिओ कॉफरन्सिंग द्वारे सूनवणीं न घेता प्रत्यक्ष सूनवणीं घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
याबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी याचं समाधान असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी आता 8, 9 आणि 10 मार्चला होईल. यावेळी याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आलाय. तर 12, 15, 16 आणि 17 मार्चला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलाय. तसेच 18 मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल. त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने गेल्यावेळी ज्या चुका केल्या त्या पुन्हा आता न्यायालयात करू नये, असे मराठा आरक्षण याचिककर्ता विनोद पाटील म्हणाले. सरकारने आता तरी गंभीर होत पूर्ण तयारी करून न्यायालयात बाजू मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, आजच्या सूनवणीकडून मराठा समाजाला आशा असल्याचे विनोद पाटील म्हणाले.