नवी दिल्ली : Sheena Bora murder case : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती आणि सीबीआय या हत्येचा तपास करत आहे. तब्बल सहा वर्षानंतर इंद्राणी हिची जामीनावर सुटका झाली आहे. (Supreme Court grants bail to Indrani Mukherjea, prime accused in Sheena Bora murder case.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Sheena Bora Murder Case) अटकेचे प्रकरण सहा वर्षाहून जुने आहे आणि आता इंद्राणी मुखर्जी  (Indrani Mukherjea) तुरुंगात आहे. शीना बोरा हिची आई इंद्राणी मुखर्जी आणि तिचा तत्कालीन ड्रायव्हर श्यामवीर राय आणि तिचा माजी पती संजीव खन्ना यांनी शीना हिची कारमध्ये गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.


इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात  


शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जीने असा युक्तिवाद केला होता की, 6 वर्षांहून अधिक काळ खटला सुरु आहे, जो लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही.  इंद्राणी मुखर्जीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती तुरुंगात आहे.


शीना बोरा हत्या प्रकरणाचे गूढ कायम


शीना बोरा हत्याकांडाला जवळपास 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही या हत्येबाबत गूढ आहे.  2012 मध्ये झालेल्या या हत्याकांडाची देशभर चर्चा झाली होती. या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला. सुरुवातीला इंद्राणी मुखर्जीने शीना बोराचा मृतदेह तिची बहीण असल्याचे सांगितले होते, पण पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले.



कोण आहे शीना बोरा


इंद्राणी मुखर्जीवर तिचीच मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, इंद्राणी मुखर्जी हिने दोन लग्न केली होती. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.