प्रशांत भूषण यांना मोठा झटका, अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठरविले दोषी
अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवार दोषी ठरवले.
नवी दिल्ली : अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवार दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना हा मोठा झटका दिला आहे. आता २० ऑगस्ट रोजी या प्रकणी शिक्षा सुनावण्यात येत आहे.
नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यावर प्रशांत भूषण यांची टिप्पणी केली होती. तर दुसऱ्या ट्टिटमध्ये चार न्यायाधिशांवर लोकशाही नष्ट करण्याची भूमिका बजावल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र ट्वीटची स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध अवमान कार्यवाही सुरु केली होती.
प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केले होते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
अवमान नोटिसाला उत्तर देताना वकील भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना सांगितले की, सरन्यायाधीशांवर टीका केल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मोठेपण कमी होत नाही. सर्वोच्च न्यायालयात सर्वसाधारण सुनावणी न झाल्याने अत्यंत खर्चीक दुचाकी चालविणाऱ्या सरन्यायाधीशांविषयी ट्विट करताना टिप्पणी केली होती.
प्रशांत भूषण म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी मुख्य न्यायाधीशांविषयी केलेल्या ट्वीटमागे आपली स्वतःची विचारसरणी आहे, जी कोणालाही अप्रिय वाटेल पण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नाही. प्रशांत भूषण यांनी असा युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील अवमान कार्यवाही रद्द करावी. मात्र, त्यांचा हा युक्तीवाद ग्राह ठरला नाही. ते दोषी ठरलेत.