पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली : गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे.
कलबुर्गींची पत्नी उमा देवी यांची याचिका
कलबुर्गींची पत्नी उमा देवी यांनी याबाबत याचिका केलीये. एसआयटीच्या तपासाबाबत केंद्र सरकारनं उत्तर द्यावे, असे आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेत.
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी
कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकरांची हत्या एकाच पद्धतीनं झाल्याचा मुद्दा याचिकेमध्ये मांडण्यात आलाय. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीये.