निवडणुकीतल्या उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
निवडणुकीतल्या उमेदवारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय.
नवी दिल्ली : निवडणुकीतल्या उमेदवारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय.
निवडणुकीतल्या उमेदवारांना यापुढे निवडणुकीचं नामांकन भरताना उत्पन्नाचे स्त्रोतही सांगावे लागणार आहेत. पत्नी आणि कुटुंबीयांचं उत्पन्नही सांगावं लागणार आहे.
आतापर्यंत नामांकन भरताना फक्त संपत्तीचे विवरण दिले जात होतं, संपत्तीचे स्त्रोत सांगणं बंधनकारक नव्हतं. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उत्पन्नाचा स्त्रोत उघड करावा लागणार आहे.