नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज व्हॉट्सअॅपला चांगलंच सुनावलं आहे. सुप्रीम कोर्टाने भारतात तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यामुळे व्हॉट्सअॅपला चांगलंच सुनावलं आहे. याबाबत व्हॉट्सअॅप, आयटी आणि अर्थ खात्याकडे 4 आठवड्यात अहवाल मागवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला विश्वास दिला होता की, 'कंपनी भारतीय कायद्याचं पूर्ण पालन करेल. कंपनीने असं देखील आश्वासन दिलं होतं की, देशामध्ये व्यापक नेटवर्कच्या मुद्द्यावर सामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कंपनी एक अधिकारी देखील नेमणार आहे.'


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपने सरकारला वेगवेगळ्या स्थरावर हिंसा पसरवणाऱ्या खोट्या मॅसेजस बाबत देखील पाऊल उचलणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. याहबाबत केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंची देखील भेट घेतली होती.