नवी दिल्ली : अयोध्या राम जन्मभुमी वादावर जलद सुनावणी करण्यात यावी याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय सुनावणार आहे. सर न्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून ही सुनावणी होईल. याप्रकरणी काही ठोस प्रगती होत नसल्याने लवकर सुनावणी व्हावी असे हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी म्हटले आहे. याआधीच्या सुनावणीतील कमेटीने मध्यस्थी करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. न्यायालयाने या कमेटीला 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी न्यायाधिश एफएम कलीफुल्ला, धर्मगुरु श्रीश्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचु यांना मध्यस्थी म्हणून नियुक्त करण्यात आले. याप्रकरणाचा सर्व बाजुंनी विचार करुन, सर्वांशी बोलून यावर आपले विचार मांडण्यास यांना सांगण्यात आले होते. 4 आठवड्यात या मध्यस्थीने वाद मिटवण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर आठ आठवड्यात ही संपावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. 



मध्यस्थी प्रक्रिया ही न्यायालयाच्या नजरेखाली व्हावी तसेच गोपनीय ठेवली जावी असे सर न्यायाधिशांनी म्हटले. गरज भासल्यास मध्यस्थ आणि लोकांना पॅनलमध्ये सहभागी करु घ्यावे. ते कायद्याची मदत देखील करु शकतील.मध्यस्थांना उत्तर प्रदेश सरकार फैजाबादमध्ये साऱ्या सुविधा देईल असेही ते म्हणाले.