मुंबई : वायु प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाके विक्रीवर बंदी आणण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायायलात सुनावणी होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवणाऱ्या जस्टीस एके सीकरी आणि अशोक भूषण यांचे पीठ आपला निर्णय सांगणार आहे. 2017 मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली-एनसीआरमधील वायु प्रदूषण 2016 च्या तुलनेत कमी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय सुनावते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.


आरोग्यावर परिणाम  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली होती. तरीही काहींनी फटाके फोडले पण त्याचे प्रमाण खूपच कमी होतं.


2016 मध्ये दिल्ली ही जगातील प्रदूषित शहरांच्या रांगेत जाऊन बसली होती. दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशमधील हवेची गुणवत्ता खराब झाली होती.


यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. अशीच परिस्थिती देशातील महत्त्वांच्या शहरांमध्ये आहे. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायलय निर्णय घेऊ शकते. 


देशभरात अंमलबजावणी ?


दिल्लीमध्ये फटाके बंदी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. तिथल्या हवेतील कमी झालेलं प्रदूषण हा न्यायालयाच्या निर्णयाचा विजय म्हणावा लागेलं.


आता सर्वोच्च न्यायालय संपूर्ण देशात हा निर्णय सक्तीचा करणार का ? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.