COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, सुप्रिया सुळे यांचं हे भाषण मुद्देसूद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 
या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी फेसबूक पेजवरून शेअर केला आहे.


जमावाकडून होणारे अत्याचार आणि हत्येसारख्या संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी केलेल्या मुद्देसूद भाषणाचं यूजर्सकडून कौतुक होत आहे. गोमांसाच्या संशयावरून जमावाकडून होणारी मारहाण आणि हत्येच्या घटनांवर लोकसभेत चर्चा झाली. त्यात सुळे यांनी सहभाग घेतला होता.