नवी दिल्ली : भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असं मोदींनी ठणकावलं. तसंच जीएसटीसह सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मोदींनी उल्लेख केला. काळ्या पैशाविरोधात लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशातून भ्रष्टाचार कमी होणार, देश बदलतोय, भारताची प्रगतीपथावर वाटचाल सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. काश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी आणि शिव्यांनी सुटणार नाही तर काश्मीरच्या लोकांना आपलंसं करुनच सुटेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.  आज जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव एकाच दिवशी साजरा होतोय. त्यानिमित्तानं मोदींनी जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या.