मुंबई : सोन्यावरील भारतीयाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ झालीय. शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवल्याचं नव्या आकडेवारीवरुन समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक सुवर्ण परिषदेच्या नव्या अहवालानुसार भारतात एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 43 टक्क्यांपेक्षा अधिक राहिलीय. असं असलं तरी वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया आणि सरकारी धोरणं यांचा फटका सोनं खरेदीवर होण्याची शक्यताय. 


सरकारने आयात शुल्क वाढवले


देशातील सोन्याच्या मागणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे ही वाढही कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. 


सरकारने आता सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले आहे. हे पाऊल उचलूनही सोन्याची मागणी कमी झाली नाही, तर सरकार आणखी कठोर पावले उचलू शकते, असे मानले जाते.