पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - माजी लष्कर प्रमुख
...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो...
नवी दिल्ली : माजी लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांना आज भाजप अध्यक्ष अमित शाहा यांची भेट घेतली. भेटीनंतर सुहाग यांनी म्हटलं की, काश्मीरमध्ये चांगलं काम सुरु आहे. माझ्य़ा वेळी आधी म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. पण हा शेवटचा सर्जिकल स्ट्राईक नव्हता. गरज पडली तर पुन्हा सर्जिकल स्टाईक होऊ शकतो. पण त्यासोबत अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत की, काय आणखी एक माजी लष्कर प्रमुख भाजपमध्ये शामील होणार आहेत.
भाजप सध्या संपर्क फॉर समर्थन अभियान चालवतं आहे. ज्याअंतर्गत पक्षाचे मोठे नेते मोदी सरकारच्या चार वर्षातील कामकाजाबाबत देशातील मोठ्या व्यक्तींना सांगणार आहेत. म्हणूनच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी माजी लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांची भेट घेतली.
मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्य मंत्रीपद माजी लष्कर प्रमुख जनरल वीके सिंह सांभाळत आहेत. 31 मे 2012 ला जनरल वीके सिंह लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी गाजियाबाद येथून निवडणूक लढवली. आज ते मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत.
दलबीर सिंह सुहाग मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांचं गाव दिल्लीपासून 65 किलोमीटर लांब असलेलं झज्जर जिल्हात आहे. त्यांचे वडील देखील लष्करात होते. 1970 मध्ये एनसीसीमध्ये निवड झाल्यानंतर दलबीर सिंह सुहाग लष्करात आले. लष्कराच्या सर्वोच्च पदावर ते पोहोचले. त्यांनी 43 वर्ष लष्करामध्ये सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले.