नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जबर जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचंही निधन झालं आहे.  बंगळुरू येथील कमान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक अद्ययावत प्रकारच्या उपचारांसाठी त्यांना तामुळनाडूतील वेलिंग्टन रुग्णालयातून कमान रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं होतं. यानंतरही त्यांची प्रकृती गंभीरच होती. 


CDS बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचा मृत्यू 
8 डिसेंबरला भारतीय वायुदलाचं  एमआय-17वी5 हे हेलिकॉप्टर जनरल बिपीन रावत यांच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांना घेऊन रक्षा सेवा स्टाफ कॉटेज, वेलिंग्टन (निलगीरी हिल्स) येथे जात होतं. 


कुन्नूर येथे या हेलिकॉप्टरला अतिशय भीषण अपघात झाला यामध्ये अपघातानंतर लगेचच 13 जाणांचा मृत्यू झाला होता. फक्त कॅप्टन वरुण सिंह हेच या अपघातातून बचावले होते. 


अखेर बुधवारी त्यांचीही प्राणज्योत मालवली. ज्यानंतर पुन्हा एकदा देश हळहळला. 


शौर्य चक्रनं कॅप्टन सिंह यांचा सन्मान 
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना यंदाच्याच वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य चक्रनं सन्मानित करण्यात आलं होतं. 


मागील वर्षी एका उड्डाणादरम्यान ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या तेजस या लढाऊ विमानामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मिड एअर इमरजन्सी असतानाही त्यांनी सुरक्षित लँडिंग केली होती. 


ग्रुप कॅप्टन सिंह यांना याच साहसी कर्तृत्त्वासाठी शौर्य चक्र देत गौरवण्यात आलं होतं.