Sushma Swaraj Memories: जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, एक फोन पुरे! सुषमा स्वराज आणि त्यांच्या बचाव मोहिमा…
Sushma Swaraj Birth Anniversary : भारतीय राजकारणात आजवर अनेक कणखर महिला नेतृत्त्वं पाहायला मिळाली. याच यादीत आघाडीवर असणारं आणि अतिशय मानानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे सुषमा स्वराज. फार कमी वयात कॅबिनेट मंत्रीपद मिळणं हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीती मैलाचा दगड होता. सुषमा स्वराज यांच्या चर्चेत राहिलेल्या 5 गोष्टी ज्यामुळे त्या ठरल्या खऱ्या अर्थाने Saviour.
Iron Lady Of India म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या सुषमा स्वराज आज त्यांची जयंती. भारतीय सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी परदेशामध्ये विविध कारणांनी अडकलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. अशा कमालीच्या महत्त्वाकांक्षी सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणातील अंबाला येथे 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला होता. आज त्यांच्या जन्मतिथीच्याच दिवशी अनेकांनाच या नेतृत्त्वाची आठवण झाली आहे. महान व्यक्तिमत्त्व असलेल्या सुष्मा स्वराज अतिशय प्रभावी पद्धतीने आपलं मत मांडायचं एवढंच नव्हे तर त्या अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रकरणे समजून घेण्याची असामान्य क्षमता असलेल्या भारतीय राजकारणी होत्या. सुषमा स्वराज यांचं खंबीर, निर्भय आणि उत्तम परराष्ट्र धोरण आणि प्रशासकीय क्षमता यामुळेच त्यांनी कायमच सर्वसामान्यांची मने जिंकली आणि ‘आयर्न लेडी’ ही पदवी मिळवली. सुषमा स्वराज यांनी आपल्या कारकिर्दीत केलेली 5 अतिशय महत्त्वाची कामे ज्यामुळे त्यांनी कायमच सर्वसामान्यांची मने जिंकली. ही 5 प्रकरणे कोणती ते जाणून घेऊया.
इराकमधून 46 नर्सेसची सुटका
14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणाच्या अंबाला कँटमध्ये जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी 1970 च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अशी अनेक कामे केली ज्यामुळे त्या कायमच लोकांच्या स्मरणात राहतील. त्यापैकी एक म्हणजे ज्या 46 भारतीय नर्सेसच्या स्टोरीवर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट तयार झाला त्यांच्यासाठी सुषमा स्वराज देवदूत म्हणून पुढे आल्या.
2014 मध्ये, सुन्नी अतिरेकी संघटना ISIS ने 46 भारतीय परिचारिकांना ओलीस ठेवले होते आणि या भारतीय परिचारिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रयत्न केले होते. सुषमा स्वराज यांनी स्वत: या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले आणि सर्व परिचारिका सुखरूप भारतात परत येईपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ५ जुलै २०१४ रोजी इराकहून ४६ भारतीय परिचारिकांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले तेव्हा सुषमा स्वराज यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परिचारिकांना घरी परत आणण्यासाठी सुषमा स्वराज यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल देशभरातील लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मलेशिया एअरपोर्टव मुलाचं शव घेऊन अडकली महिला
ऑस्ट्रेलियावरून भारतात मुलाला घेऊन येत असलेल्या आईच्या मुलाचा मृत्यू कुआलालंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला. एका तरुणाने ट्विट करुन तेव्हाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना या घटनेबाबत माहिती करुन दिली. ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी कुआलालंपुर येथे असलेल्या भारतीय दूतावासांशी संपर्क साधून सरकारचा खर्चात मुलाचे शव भारतात आणले.
ज्युडिथ डिसोझाची सुरक्षित सुटका
जून 2016 मध्ये काबूलमध्ये अपहरण करण्यात आलेली भारतीय मदत कर्मचारी ज्युडिथ डिसोझाची, परराष्ट्र मंत्रालयाने तिच्या सुरक्षित सुटकेसाठी अफगाणिस्तान सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर, संशयित अतिरेक्यांनी सुटका केली. ती सुखरूप मायदेशी परतली आणि आल्यानंतर लगेचच ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना भेटायला गेली.
बसमा मोहम्मद फैसलला जलद व्हिसा
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध अतिशय विरोधात असताना, ऑक्टोबर 2015 मध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानमधील 5 वर्षांच्या बसमा मोहम्मद फैसलच्या बचावासाठी आल्या. या चिमुरडीला यकृताच्या दीर्घ आजाराने ग्रासले होते आणि तातडीनं यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, ती जिथे राहत होती तिथे ओमानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये या आजाराबाबत संबंधित सुविधा नसते. पालकांनी चेन्नईमध्ये ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, स्वराज यांनी खात्री केली की, त्वरित व्हिसा जारी केला जाईल, जेणेकरून मुलाला प्रत्यारोपणासाठी भारतात प्रवास करता येईल.
वडिलांच्या अंत्ययात्रेसाठी व्हिसा
2016 ऑक्टोबरमध्ये, सारिका टाकरू यांनी ट्विटरद्वारे सुषमा यांच्याशी संपर्क साधला की तिच्या पतीचे निधन झाले आहे आणि तिच्या मुलाला भारतात वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी भारतीय व्हिसा मिळू शकला नाही, कारण दूतावास सुट्टीमुळे बंद होते. अशावेळी सुषमा स्वराज यांनी तत्परतेने उत्तर दिले आणि आपल्या मुलाला व्हिसा मिळण्याची व्यवस्था केली.