Extra Marital Affair : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झालीय. संसार हा दोघांचा असतो, पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास हे नातं पुढे जात असतं. पण हल्ली नवरा असो किंवा बायको कारणे काही असो, विवाहबाह्य संबंधात अडकत आहेत. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एका पत्नीने नवऱ्याचा काळा प्रतापाचा छडा लावला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पत्नीने पतीला हॉटेलच्या खोलीत दोन मुलींसोबत रंगेहात पडकलंय. पोलिसांना घेऊन ही महिला हॉटेलमध्ये पोहोचली मग इथे बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा चालला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा पोलीस खोलीत पोहोचले, तेव्हा टेबलवर अनेक आक्षेपार्ह वस्तू त्यांना आढळून आलेत. ज्यामध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि उघडे कंडोमचे पाकीट पाहून पत्नीचा राग अनावर झाला. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर रुममध्ये सापडलेल्या दोन तरुणींही चौकशी करण्यात येत आहे. हा धक्कादायक प्रकार भुवनेश्वरच्या पटिया भागातील एका हॉटेलमधील आहे. याप्रकरणी इन्फोसिटी पोलीस तपास करत आहेत. 


पत्नीने पकडलं नवऱ्याला रंगेहात 


पीडित पत्नीने इन्फोसिटी पोलिसांशी संपर्क साधून पतीच्या हालचालींची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर महिला आणि पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. पोलीस आरोपी ज्या रुममध्ये होते, तेथे पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. आरोपींला बाहेर पोलीस आल्याचा सुगावा लागला होता त्यामुळे ते बिथरले. बराच वेळ त्याने दरवाजा उघडला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदत करत रुमचा दरवाजा उघडला.


हेसुद्धा वाचा - मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...


पोलीस आणि महिला रुममध्ये गेल्यावर आतील दृष्य पाहून संतापले. रुममध्ये आरोपी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी संपूर्ण खोलीची कसून चौकशी केली असता त्यांना दोन तरुणी बाथरूममध्ये लपलेल्या आढळल्या. महिला पोलिसाने त्यांना बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, तो शुटिंगबाबत चर्चा करण्यासाठी आला होता आणि त्याच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पत्नी त्याला वारंवार विचारत होती, तू हे काय करतोस? बायकोच्या प्रश्नावर मात्र तो चिकार शब्दही काढला नाही. या छाप्यानंतर पती आणि दोन्ही मुलींना इन्फोसिटी पोलिसांनी ठाण्यात नेलं असून तिथे त्यांची चौकशी सुरु आहे.